आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:"श्री वल्लभेश मंगलम’अनोखा विवाह, दगडूशेठ मंदिरात विविधरंगी पडद्यांची व फुलांची आरास

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुभमंगल सावधानचे मंगल सूर... अक्षता आणि गुलालाची मुक्त उधळण... ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण आणि पारंपरिक वेशातील वऱ्हाडी मंडळी अशा उत्साही वातावरणात चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा रविवारी मंदिरात आयोजित करण्यात आला होता. श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेवून सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. सभामंडपात विविधरंगी पडद्यांची व फुलांची आकर्षक आरास करून लग्नमंडपाचे स्वरूप देण्यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते वऱ्हाडी मंडळींच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान, राज्यात दोन वर्षांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले. यामुळे मंदिरात भाविकांची मोठी उपस्थिती होती.

दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी सोहळा पार पडला.

अशी सांगतात प्रथा
गाणपत्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे विद्यमान असतात. कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्त्वाची इच्छा होते. त्या इच्छापूतीसाठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. ती मोरयाची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...