आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन नव्या स्वरुपात, ढाेल-ताशा पथकांनी वेळेच्या मर्यादाचे पालन करावे : पोलिस

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून आेळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या भवनाचे व संग्रहालयाचे इंद्राणी बालन फाउंडेशनद्वारे नूतनीकरण करण्यात आले. पुण्याचे पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि त्यांच्या पत्नी जुगनू गुप्ता यांच्या हस्ते या भवनाचे उद्घाटन बुधवारी पार पडले.

या वेळी उत्सव प्रमुख पुनीत बालन, जान्हवी बालन, अपर पाेलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, सूरज रेणुसे, सुनील माने उपस्थित हाेते. याप्रसंगी पाेलिस आयुक्त गुप्ता म्हणाले की, भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाच्या वास्तू एेतिहासिक असून त्याच्या मूळ स्वरूपात काेणत्याही प्रकारे बदल न करता नूतनीकरण करण्यात आले ही बाब चांगली आहे. ही सुंदर एेतिहासिक वास्तू आगामी काळात पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल. भाऊसाहेब रंगारी यांच्या काळातील विविध गाेेष्टीची माहिती, फाेटाे, शस्त्र या ठिकाणी पाहावयास मिळतील.

गुप्त दालने, रस्ते, शस्त्रे सन १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशाेत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यातील शनिवारवाडाजवळील भाऊसाहेब रंगारी भवन या वास्तूत राेवली गेली. क्रांतिकारकांचे माहेरघर म्हणून ही वास्तू नावारूपास आली हाेती. या ठिकाणी असलेले गुप्त रस्ते, गुप्त दालने, ब्रिटिशकालीन एेतिहासिक शस्त्रास्त्रे, वाड्यातील सेंट्रल लाॅकिंग सिस्टिम आणि लाकडी बांधकाम आदी गाेष्टी नव्या स्वरूपात दिसतील.

बातम्या आणखी आहेत...