आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचे थेट महाराष्ट्र कनेक्शन समोर येत असून, या प्रकरणी पंजाब पोलिसांनी पुण्यात दोघांना बेड्या ठोकल्यात. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव संशयितांचे नाव आहेत. या दोघा शार्प शूटर्सना अधिक तपासासाठी पंजाबमध्ये नेऊन कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.
पुणे पोलिस अंधारात
गायक मुलेवाला हत्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी ही परस्पर कारवाई केली असून, या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही, असे पुणे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. मात्र, मुसेवाला हत्याकांडाचे कनेक्शन पुण्याशी जोडले जात असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सौरभ महाकाळ याला मंचर येथून, तर संतोष जाधव याला पुणे शहरातून उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
कॅनडास्थित गँगशी संबंध
पंजाबी गायक आणि राजकारणी सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येचे कनेक्शन हे कॅनडास्थित गँगशी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या हत्येची जबाबदारी तिहार जेलमध्ये असलेल्या बिष्णोई या कुख्यात गंडाने घेतली होती. मुसेवाला हे त्यांच्या गाडीने जात असताना २९ मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात त्यांना दोघांनी गोळ्या घालून ठार मारले होते.
8 शार्प शूटर्सची ओळख पटली
मुसेवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या 8 शार्प शूटर्सची ओळख पटवण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. सर्व शार्प शूटर्स कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आहेत. याच शार्प शूटर्सनी 29 मे रोजी मानसा येथे एका पंजाबी गायिकेची गोळ्या झाडून हत्या केल्याचा पंजाब पोलिसांना संशय आहे. शार्प शूटर्सची ओळख पटल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहे.
हत्येआधी सर्व शार्पशूटर्स एकत्र
मूसवाला हत्याकांडात महाराष्ट्रातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांच्याशिवाय सुभाष बोंडा, मनजीत सिंग, प्रियवर्त फौजी, हरकमल, जगरूप सिंग रूपा आणि मनप्रीत सिंग यांचा सहभाग आहे. यातील हरकमल, रूपा आणि मनप्रीत हे पंजाबचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांच्या हत्येच्या तीन दिवसांपूर्वी हे सर्वजण कोटकपुरा महामार्गावर जमले होते.
जोधपूरमधून शस्त्रे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर लॉरेन्सने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला सांगितले की, मूसवाला यांच्या हत्येसाठी शस्त्रे राजस्थानमधील जोधपूरमधून आणण्यात आली होती. हे शस्त्र विजय, राका आणि रणजित नावाच्या 3 गुंडांनी आणले होते.
राजस्थानहून बोलेरो आणली
पंजाब पोलिसांच्या तपासात हल्लेखोरांसाठी राजस्थानमधून बोलेरो गाडी आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी नसीब खान याने ही बोलेरो आणली होती. त्याने ती बोलेरो फतेहाबादमध्ये चरणजीतला दिली. चरणजीतनेच बोलेरो पंजाबमध्ये आणली होती. त्यानंतर याच गाडीतून मुसेवालाची हल्लेखोरांनी रेकी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
युपी आणि नेपाळमध्ये लपले शार्प शूटर्स
मुसेवाला यांची हत्या करणारे शार्प शूटर्स उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये लपले असावेत, असे पंजाब पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांनी नेपाळमध्ये छापे टाकले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.