आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आठ हल्लेखाेरांची नावे पाेलिस तपासात समोर आली आहे. यात पुण्यातील सराईत गुन्हेगार संताेष जाधव आणि साैरव महाकाल या दोघांचा समावेश असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, पुणे ग्रामीण पाेलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या दाेन आरोपींबाबत पंजाब पाेलिसांकडून कोणताही दुजोरा मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
संताेष जाधव हा मंचर(जि. पुणे) येथील सराईत गुन्हेगार आहे. १ ऑगस्ट २०२१ रोजी मंचरमधील आंेकार बाणखेले (२५) या तरुणाची त्याने फेसबुक स्टेटसच्या वादातून हत्या केली हाेती. या प्रकरणात जाधव फरार आहे. राजस्थानमधील गंगानगर येथे एका व्यावसायिकाला खंडणीकरिता धमकावण्यासाठी त्याचे घर व व्यावसायिकाच्या पत्नीच्या क्लिनिकबाहेर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यातही पोलिस संतोष जाधवचा शाेध घेत आहेत. एप्रिल २०२२ मध्ये पुणे ग्रामीण पाेलिसांचे एक पथकही त्याच्या शाेधासाठी राजस्थानला आले. परंतु ताे सापडला नव्हता. जाधवविरोधात बाललैंगिक अत्याचार, बलात्कार, आर्म्स अॅक्ट, खुनाचा प्रयत्न, खुनाच्या घटनेत अल्पवयीन मुलांचा सहभाग करून घेणे अशा प्रकारे चार गुन्हे मंचर पाेलिस ठाण्यात यापूर्वी दाखल आहेत. दुसरा आरोपी साैरव महाकाल हा पुणे जिल्ह्यातील देहू रोड, तळेगाव दाभाडे परिसरातील असल्याची माहिती समोर आली असून त्याबाबतची खातरजमा पाेलिस करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.