आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण:मुंबई, दिल्ली पंजाब पोलिसांची पथके पुण्यात, ग्रामीण पोलिसांना आरोपीची 13 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात हल्लेखोरांपैकी संशयित आरोपी म्हणून पुण्यातील संतोष जाधव याचे नाव समोर आले आहे. संतोष जाधव याचा साथीदार सौरव महाकाल या घटनेने सहभागी आहे का या दृष्टीने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस कार्यालयात मुंबई दिल्ली आणि पंजाब पोलिसांची पथके दाखल झाली आहे. त्याच सोबत मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकारीही पुण्यात आलेले आहेत.

अभिनेता सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत मुंबई पोलीस पथक महाकाल यांच्याकडे चौकशी करणार आहे. तर पंजाब पोलिसांना मुसेवाला खून प्रकरणात महाकालने खुना पूर्वी रेकी केल्याचा संशय असून त्याबाबत तपास करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांचे पथक पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत दाखल झाले असून तेही मूसेवाला प्रकरणासंदर्भात आणि राजस्थान मधील विष्णू लॉरेन्स गँग या अनुषंगाने आरोपीकडे चौकशी करत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांना आरोपीची 13 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या दरम्यान आरोपीस राजस्थान पंजाब आणि हरियाणा या विविध भागात तपासा करता घेऊन जायचे आहे आणि त्याच्याकडे मूसेवाला प्रकरणाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करावयाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...