आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्षणीय वाढ:लॉकडाऊन काळातही महाराष्ट्राची बेदाणे आणि गुळाच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

जयश्री बोकील|पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याने प्रचलित क्लस्टर्सपेक्षा वेगळ्या क्षेत्रातही वाढवली निर्यात

मार्च २०२० पासून कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळातही राज्याने बेदाणे आणि गुळाच्या निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की, केंद्र सरकारने समाविष्ट केलेल्या राज्याच्या सहा क्लस्टर्सव्यतिरिक्त राज्याने विकसित केलेल्या अन्य क्लस्टर्सच्या यादीतील ही दोन उत्पादने आहेत. राज्याची बेदाण्याची निर्यात ३० टक्क्यांनी, तर गुळाची निर्यात १६ टक्क्यांनी वाढली आहे. सांगली जिल्ह्यात बेदाण्याची उलाढाल १५०० कोटी आहे.

त्यामुळे राज्याच्या एकूण निर्यातीत तब्बल २१ क्लस्टर्सचा समावेश आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभी हाती आलेल्या आकडेवारीनुसार बेदाणे आणि गूळ या दोन क्लस्टर्सच्या निर्यातीत उत्तम वाढ नोंदवण्यात आली आहे. शिवाय बेदाणे आणि गूळ आयात करणाऱ्या देशांची संख्याही वाढली आहे.

पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले, ‘कृषी मालाच्या निर्यातवृद्धीसाठी केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ मध्ये स्थिर आणि निर्धारणक्षम कृषी निर्यात धोरण जाहीर केले. निर्यातक्षम कृषी मालाचे उत्पादन, त्याची मूल्यवृद्धी, प्रक्रिया, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा काबीज करणे अशी संपूर्ण मूल्यसाखळी वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. या कृषी निर्यात धोरणामध्ये निर्यात-आधारित उत्पादन, शेतकऱ्याचे उत्पन्न व शासनाच्या विवीध योजनांच्या समन्वयातून निर्यातवृद्धी यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. “शेतकरी केंद्रित दृष्टिकोन’ विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या स्तरावरच शक्य तेवढी मालाची मूल्यवृद्धी करून कृषी मालाचे होणारे सुगीपश्चात नुकसान टाळण्याचा हेतूही आहे.’

निर्यातवाढीची ही आहेत कारणे :

> निर्यातवृद्धीसाठी अत्याधुनिक सुविधा

> अपेडा, कृषी पणन मंडळाच्या विविध योजना

> उत्पादनांची हाताळणी, वाहतुकीच्या सुविधा

> ब्रँडिंग - बेदाणा (सांगली) व गूळ (कोल्हापूर) यांना भौगोलिक मानांकन आहे.

> पॅनहाऊसची संरचना

> निर्यातविषयक प्रशिक्षण कार्यक्रम

ब्रँडिंगच्या प्राधान्यातून निर्यातवाढ

राज्यातील २१ क्लस्टर्सअंतर्गत कृषिसंबंधित उत्पादनांच्या निर्यातवृद्धीसाठी कृषी पणन मंडळाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. क्लस्टर्सचे योग्य ते ब्रँडिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे बेदाणे, गूळ या क्लस्टर्सच्या निर्यातीत वाढ झाली असून आयातदार देशांची संख्याही वाढली आहे. - सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ

आयातदार देश :

श्रीलंका, नायजेरिया, नेपाळ, मलेशिया, टांझानिया, यूएसए, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, केनिया, सुदान, सोमालिया, युगांडा, मोरोक्को, सौदी अरेबिया, व्हिएतनाम, रशिया, ओमान, पोलंड, तुर्की, जर्मनी

बातम्या आणखी आहेत...