आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआषाढी वारीचे नियोजन काटेकोरपणे व्हावे, सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना वारीसंदर्भातील योग्य ते मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘आषाढी वारी 2022’ या अॅपला जिज्ञासूंनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीलाच सात हजारांपेक्षा अधिक जिज्ञासूंनी हे अॅप डाऊनलोड केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
लक्षणीय डाऊनलोड
'आषाढी वारी 2022' हे अॅप वारीच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक विकसित करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सर्व अपडेट्स, ट्रॅकिंग सिस्टीम, नकाशे, करंट लोकेशन, वाटचालीतील सर्व महत्त्वाचे टप्पे, मुक्कामाच्या जागा, विसाव्याच्या जागा, वेळापत्रक, दर्शनाची सुविधा - थेट पंढरपूरपर्यंत, या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माहितीपूर्ण असल्याने हे अॅप डाऊनलोड करून घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
या सुविधा मिळणार
अॅपमध्ये दोन्ही पालखी सोहळ्यांचा तपशील, सोहळाप्रमुख, उत्सवप्रमुख, पदाधिकारी, वैद्यकीय सुविधा (तालुका आरोग्य अधिकारी, फिरती वैद्यकीय पथके, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मागार्वरील खासगी वैद्यकीय व्यावसायिक) त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांच्या सुविधा, पाण्याची उपलब्धता, टॅंकर सुविधा, अन्नपुरवठा आणि वितरण व्यवस्था, विद्युतपुरवठा अशा सेवा सुविधा आणि संबंधित व्यक्तींचे क्रमांक, असा तपशील देण्यात आला आहे.
लाइव्ह दर्शन उपलब्ध
वाटेतील महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या यांचेही संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. पोलिस मदतीची गरज भासल्यास ते संपर्कही आहेत. चाईल्ड हेल्पलाईन, वुमन हेल्पलाईनही देण्यात आली आहे. कोरोना मदतीसाठीही सुविधा आहे. जिज्ञासू मंडळी गूगल प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करू शकतात. याशिवाय अॅपवर वारीचे लोकेशन, रोजचा प्रवास आणि गॅलरी, तसेच लाईव्ह दर्शनही उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.