आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेले 21 हजार 31 सिम कार्डस दूरसंचार विभागाने केले रद्द

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले फोनचे 21 हजार 31 सिम कार्डस दूरसंचार विभागाने रद्द केले आहेत. पुणे कार्ड्स सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जातात. बनावट सीमकार्डस तयार करणारे लोकांनी या गैरव्यवहारात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची बनावट ओळखपत्रे/ बनावट पत्ते दाखवणारी कागदपत्रे तयार केली आहेत जी तपासात उघड झाली.

दूरसंचार विभागाने, अशा कागदपत्रांच्या आधारे होणारे सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान हाती घेतले असून त्यासाठी अभिनव आणि स्वदेशी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान, ह्या संकल्पनेचा वापर करत त्या आधारावर, चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या फेशियल रेक्गनिशन पॉवर्ड सोल्यूशन (एएसटीआर) ह्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने बनावट सिम कार्डस शोधून काढली आहेत.त्यानुसार 21 हजार 31 सिम कार्डस दूरसंचार विभागाने रद्द केली आहे.

एएसटीआर प्रकल्पामागचे उद्दिष्ट सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या ग्राहकांचे एकत्रित विश्लेषण करणे, आणि विश्वासार्ह नसलेले मोबाईल क्रमांक ओळखून त्यातून ते वजा करण्याचे काम केले गेले. या सिस्टिममध्ये दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला दिलेल्या ग्राहकांचा डेटाबेस वापरुन, एकच चेहरा आणि त्याचे वेगवेगळे क्रमांक ओळखले जातात.याच प्रणालीचा वापर करत, महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागाच्या ग्राहक डेटाबेसचे विश्लेषण केले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जारी केल्याचा संशय असलेले एकूण 21 हजार 31 सिम ओळखून ती रद्द केली आहे .

सिम विक्रेत्यांवर कारवाया

अशा फसव्या, बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोषी लोकांवर आणि सिम विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा पीओएस सिम विक्रेत्यांना सेवा प्रदात्यांद्वारे आणि काळ्या यादीत टाकले जात आहे. पुढील तपास करून दोषींवर आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात येत आहे अशी माहिती दूरसंचार विभागाने दिली आहे.