आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Singing 'Mausam Mastana', The Senior Lawyer Demands A Kiss From The Junior A Female Lawyer Was Molested In The Court Premises And Beaten Up When She Asked An Answer

जेष्ठ वकिलाने केला ज्युनिअरचा विनयभंग:न्यायालय परिसरात किसची मागणी, जाब विचारताच मारहाण

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका ज्येष्ठ वकीलाकडे ज्युनिअर वकील म्हणून काम करत असलेल्या एका 37 वर्षीय महिला वकीलाचा 40 वर्षीय वकीलाने न्यायालयाच्या परिसरातच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अ‍ॅड. धर्मराज विनायक जाधव (वय-40, रा.वाघाेली, पुणे) यांच्या विराेधात पिडित महिला वकीलाने शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाेलीसांनी आराेपी वकीलावर मंगळवारी रात्री विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकार 6 व 21 जुलै 2022 राेजी पुणे-अहमदनगर रस्त्यावर तसेच शिवाजीनगर सिव्हील बिल्डींगच्या जिन्याखाली व काेर्ट गेट क्रमांक 1 जवळ पार्किंग मध्ये घडल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले आहे. सदर महिला पुण्यात राहण्यास असून ती अ‍ॅड. धर्मराज जाधव यांच्याकडे काही दिवसांपासून ज्युनिअर वकील म्हणून काम करत आहे.

गाणे गात किसची मागणी

अ‍ॅड. जाधव यांच्यासाेबत माेटारीतून ती पुणे न्यायालयात येत असताना जाधव यांनी तिला पाहून ‘मौसम मस्ताना है’ गाणे गात तिच्याकडे किसची मागणी केली. तसेच शिवाजीनगर न्यायालयात आल्यानंतर तिच्या शरीराला जाणीवपूर्वक स्पर्ष करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले.

जाब विचारताच मारहाण

या प्रकाराने संतापलेल्या महिलेने तिच्या पतीला याबाबत सांगितले. याबाबत जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदर दाेघांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यामुळे याबाबत पिडित महिलेने शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आराेपीवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पाेलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...