आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:पुण्यात लागोपाठ सहा अपघात; दोन जण जागीच ठार, तर सहा जण जखमी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील अपघातात ट्रकच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. - Divya Marathi
पुण्यातील अपघातात ट्रकच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला.
  • जखमींमध्ये सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश, जखमींवर उपचार सुरू

मुंबई- बंगळुरू महामार्गावर सोमवारी सकाळपासून लागोपाठ सहा ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. मुंबई- बंगळुरू महामार्गावरील कात्रज बोगदा ओलांडून पुण्याच्या दिशेने येत असताना हे सर्व अपघात झाले आहेत. या रस्त्यावर उतार असल्यामुळे हे अपघात झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वप्रथम पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. तर दुसरा अपघात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी झाला. दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक बसली. यात यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

मालवाहतूक ट्रकच्या केबिनमध्ये चालकासह तिघे जण अडकून पडले होते. राजू मुजुलडे आणि अजय मुजुलडे (मु.रा.मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले होते त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. तिसरा अपघात भुमकर चौकात झाला. भाजीपाल्याची वाहतूक करणारा ट्रक सर्व्हिस रस्त्यावर उलटला. चौथा अपघात पुन्हा त्याच ठिकाणी झाला. या अपघातात रिक्षातील सहा महिन्यांचे बाळ आणि त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाला आहे. इतर दोन अपघातात काही जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...