आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अनैतिक संबंधांवरून मित्रावर कोयत्याने वार

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना कर्वेनगर भागात रविवारी घडली आहे. याप्रकरणी नीलेश श्रीधर ताटे (३५, रा. कर्वेनगर, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास सुनील कांबळे (३३) याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास कांबळे याच्या ओळखीतील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी ताटेला होता. या कारणावरून ताटेने कांबळेला शिवीगाळ करून हातावर कोयत्याने वार केला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक एन. जाधव पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...