आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 प्रकारचे पदार्थ शिजवता येणारा अनोखा कुकर:सौर-विद्यूत ऊर्जेवर चालणाऱ्या स्मार्ट कुकरचे उद्धाटन, सर्वसामान्य महीलांमध्ये उत्सुकता

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला उद्योजिका स्वाती कानडे यांनी सौर ऊर्जेवर व विद्युतवर चालणाऱ्या स्मार्ट कुकरची निर्मिती करुन एक नवा इतिहास निर्माण केला असल्याची भावना पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी शनिवारी व्यक्त केली आहे .दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या वतीने आयोजित केलेल्या महिला उद्योजिका परिषदेत या कुकरचे उद्घाटन करण्यात आले .

40 पदार्थ शिजवता येतात!

या स्मार्ट कुकरमध्ये 40 प्रकारचे पदार्थ बनविले जाऊ शकतात. हा कुकर कोठेही सहजरीत्या घेऊन जाणे शक्य आहे. कोणत्याही महिलेसाठी उपयोगी असणाऱ्या या कुकरला स्टार्ट अप इंडियाने या प्रमाणित केले आहे.

महिलांमध्ये उत्सूकता

या कुकरची निर्मिती स्वाती कानडे यांनी ' अनेकम ' या संस्थेच्या माध्यमातून केली आहे .या उत्पादनाला पेटंट मिळाले असून याबाबत कानडे यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले . या कुकरचे उत्पादन मोठ्या स्वरूपात करण्यात येत आहे .सर्वसामान्य महिलांना या कुकरविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे .या कुकराचे उत्पादन मोठ्या स्वरूपात करण्यात येत आहे अशी माहिती कानडे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी डिक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे ,राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार नररा ,प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर ,सीमा कांबळे ,निवेदिता कांबळे ,स्वाती कानडे ,प्रवीण कांबळे ,विजय मोहिते , यासह दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी महिला व उद्योजिका मोठ्या प्रमानात उपस्थित होते .

बातम्या आणखी आहेत...