आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफीयांकडून वाळूची तस्करी:तहसील कार्यालयाने 2018 मध्ये ताब्यात घेतलेले ट्रक चोरत वाळू वाहतुकीसाठी वापर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळू माफियांवर कारवाईचा बडगा 2018 साली उगारण्यात आला होता. यावेळी वाळुची अवैध वाहतूक करणारे 9 ट्रक तहसील कार्यालयाने ताब्यात घेतले होते. तहसील कार्यालयातील अधिकारी कारवाई करून दौंड येथे पुढील कारवाईसाठी गेले असताना हे ट्रक चोरी करण्यात आले होते. हेच ट्रक चोरी करणार्‍या मालकासह त्याच्या चालकाला गुन्हे शाखेच्या युनिट चारने रविवारी अटक केली आहे.

ट्रक मालक मुख्तार मैनुद्दीन काझी आणि त्याचा चालक सुदाम उर्फ सुधीर संपत ढगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 2018 साली सरकारी ताब्यातील ट्रक चोरी करून त्या ट्रकचा घोडेगाव परिसरात पुन्हा अवैध वाळू वाहतुकीकरीता वापर होत असल्याची माहिती युनिट 4 चे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांना मिळाली होती. यावेळी घोडेगाव परिसरात शेवाळवाडी येथून चोरीला गेलेल्या ट्रक पैकी एक ट्रक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला. याप्रकरणी चालक ढगे याला पकडल्यानंतर त्याचा मालक काझी अशा दोघांनी मिळून ट्रक चोरून नेल्याची कबुली दिली. दोघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावक, निरीक्षक जयंत राजुरकर, अंमलदार शितल शिंदे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...