आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा धोका:पुणे महापालिकेची इमारतच कोरोना हॉटस्पॉट ठरण्याचा धोका, आतापर्यंत 108 कर्मचाऱ्यांना बाधा

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 108 पैकी 10 जणांचा मृत्यूही झाला आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढताना दिसत आहे. सामान्य व्यक्तींसह कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत आहे. दरम्यान पुण्यातून एक धोकादायक बातमी आहे. पुण्यातील महानगरपालिकेची इमारतच आता कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण पुणे पालिकेत नेहमीच येत जात असणाऱ्या नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांसह त्यांच्या नातलगांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान आतापर्यंत पुणे पालिकेतील 108 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर या 108 पैकी 10 जणांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिका इमारतच कोरोना हॉटस्पॉट ठरणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. कारण महापालिकेच्या इमारतीमध्ये दिवसभरात कामानिमित्त अनेक लोकांचा वावर असतो. अनेकांची पालिकेमध्ये कामं असतात. मात्र यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. 

पुणे महापालिकेतील एकूण 108 कोरोना बाधितांमध्ये 44 सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 108 कर्मचाऱ्यांपैकी 53 जणांनी यशस्वी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.तर 45 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 14 हजार 181 पर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 560 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 

बातम्या आणखी आहेत...