आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे कसले उच्चशिक्षित:पुण्यात सोशल मीडियातून ओळख झालेल्या मैत्रिणीचा आयटी अभियंत्याकडून छळ

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात साेशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका ३५ वर्षीय विवाहित तरुणीचा आयटी अभियंत्याने छळ करून तिला बदनामी करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाेलिसांनी आरोपी सुहास राधाकृष्ण नवले (वय ३६, रा. गंगाधाम, पुणे) यास मंगळवारी रात्री अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नेमके प्रकरण काय?

काेंढवा पाेलिसांकडे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर तरुणी व आरोपी यांची साेशल मीडियाच्या माध्यमातून ओळख हाेऊन मैत्री निर्माण झाली. मात्र, सुहास नवले याचे इतर मुलींसाेबत संबंध असल्यामुळे विवाहितेने त्याच्याशी बाेलणे बंद करत त्याचा नंबर ही ब्लाॅक केला. मात्र, या गाेष्टीचा राग आल्याने आरोपीने सात जून राेजी महिला तिच्या मुलीस शाळेतून साेडून घरी येत असताना पाठलाग केला. तिच्या पाठीमागे माेटारसायकलवर आला. मला तुझ्याशी काही बाेलायचे आहे, म्हणत तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेली.

पैसे घेऊन पळाला

महिला त्या ठिकाणावरून निघून जात असताना आरोपीने तिच्या खिशातून सात हजार रुपये किमतीचा मोबाइल फाेन जबरदस्तीने काढून पळून गेला. तसेच तिच्या मोबाइल क्रमांकावर वेगवेगळया फाेन नंबरवरुन फाेन करून, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचे अश्लील फाेटाे व व्हिडीओ नकळत काढून ते महिलेस दाखवले. तसेच तिचे नातेवाईक व साेशल मीडियावर हे फाेटाे व व्हिडीओ पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पाेलिस उपनिरीक्षक वैशाली गपाट करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...