आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महामार्गावर भीषण अपघात:टायर फुटल्याने ट्रकला धडकली बस, 4 जणांचा मृत्यू; मृतात 2 पोलिसांचा समावेश

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • -

सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील चौफुला येथे बुधवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. टायर फुटल्याने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला लक्झरी बस धडकल्याने हा अपघात झाला आहे.

या घटनेत चार जण मृत झाले असून मृतांमध्ये पुणे पोलिस दलातील दोन पोलिसांचा समावेश आहे. तर एका पोलिस कर्माचाऱ्याच्या पत्नीचा देखील समावेश आहे. अपघातात 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमी असलेल्या काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. नितीन शिंदे (32)असे मृत पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिंदे हे पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 2 मध्ये सध्या कार्यरत होते. मृत इतर तिघांची नावे अद्याप समजू शककेली नाही.

अशी घडली घटना

बुधवारी पहाटेच्या सुमारास सोलापूरहून पुण्याच्या दिशेने एक लक्झरी बस येत होती. त्याचवेळी चौफुला ओलांडल्यानंतर महामार्गावर वाखारी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावरच बाजूला उभा करण्यात आला होता. या उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज लक्झरी बस चालकाला आला नाही. यामुळे बस थेट ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या एक बाजूचा चक्काचूर झाला आणि प्रवासी जखमी झाले.

खासगी रुग्णालयात दाखल

या अपघात पुणे पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा, एका पोलिस पत्नीचा आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक जन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना यवत आणि केडगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तर काही जखमींना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...