आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:सोलापूरचे भीमाशंकर गुरव यांचा ‘यंग सायंटिस्ट ऑफ द इयर’ने सन्मान, गायडेड पिनाक रॉकेट-लाँचर संशोधनाची केंद्र सरकारकडून दखल

सोलापूर / यशवंत पोपळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील भीमाशंकर गुरव यांनी विकसित केलेल्या गायडेड पिनाक रॉकेट (क्षेपणास्त्र) आणि ते डागण्यासाठी जे प्लॅटफॉर्म लागते त्या लाँचरच्या भरीव संशोधनासाठी भारत सरकारने “यंग सायंटिस्ट ऑफ द इयर २०१९’ या पुरस्काराने दिल्ली येथे ४ ऑक्टोबर रोजी सन्मानित केले. दरम्यान, गुरव यांनी अतिशय खडतर परिस्थितीत हे यश मिळवले आहे.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन (डीआरडिओ) अंकित पुणे येथील आयुध अनुसंधान आणि विकास संस्थापनचे ( एआरडीई ) गुरव हे जॉइंट डायरेक्टर (वैज्ञानिक एफ) असून ते मुळचे अक्कलकोट येथील रहिवासी आहेत. वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी जॉइंट डायरेक्टर होणारे भारतातील तरुण शास्त्रज्ञ आहेत. ते म्हणाले, डीआरडीओच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र सैन्याला लागणाऱ्या वस्त्रांपासून ते शस्त्रांपर्यंतचे संशोधन विकास आणि निर्मिती या ठिकाणी होते. सशस्त्र सैन्यांच्या साधन संशोधन आणि निर्मितीसाठी देशभरात अशा एकूण ४२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. भारतीय सैन्य सेवारत असलेल्या ठिकाणच्या हवामानानुसार लागणारी वस्त्रे, बूट, शिरस्त्राणे, औषधे, अन्न, दैनंदिन आवश्यक असलेली साधने आणि शस्त्रांचे संशोधन करून त्याची निर्मिती डीआरडीओ करते. सैन्याचे मानसशास्त्र आणि शरीरक्रिया शास्त्रावरही याठिकाणी संशोधन केले जाते.

पुण्याच्या एआरडीईमध्ये पिनाक क्षेपणास्त्र प्रणालीवर झालेले संशोधन मोलाची कामगिरी आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतराचे अचूक लक्ष्य भेदणे हे पिनाक क्षेपणास्त्राचे वैशिष्ट आहे.

८ क्षेपणास्त्रे साधतात ७५ किमीपर्यंत लक्ष्य
या प्रकल्पामध्ये गुरव यांनी गायडेड पिनाक रॉकेट याविषयी विशेष संशोधन केले. त्यांनी विकसित केलेली ८ क्षेपणास्त्रे एकाच वेळी २० ते ७५ किमी लक्ष्य केवळ ४४ सेकंदांत अचूकपणे भेदू शकतात. त्याची गती ही ध्वनीपेक्षा साडेतीनपट अधिक असून सुपर साॅनिक प्रकारात हे राॅकेट येतात. ज्या प्लॅटफाॅर्मवरून क्षेपणास्त्रे डागली जातात, त्याला लाँचर म्हणतात. या लाँचरमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून गुरव यांनी नवीन डिझाइन केले. फिच्युअरिस्टिक पिनाक लाँचरचे डिझाइन, डेव्हलपमेंट, रिअलायझेशन, टेस्टिंग, प्राॅडक्शन अशा महत्त्वपूर्ण संशोधनाची दखल केंद्र सरकारने घेतली.

बातम्या आणखी आहेत...