आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:लोकशाहीला झुंडशाहीचे धक्के देण्याचे काम काही जणांकडून सुरू - उपमुख्यमंत्री अजित पवारांची विरोधकांवर टीका

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही देशात एकता, अखंडता, सर्वधर्मसमभाव ही आपली बलस्थाने असताना, लोकशाहीला झुंडशाहीचे धक्के देऊन इजा पोहचविण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. समाजात विष पेरण्याचे काम सुरू असून नको त्या गोष्टी मागे फरफटत जाणे देशाला राज्याला परवडणारे नाही. देशाची एकता ,अखंडता धोक्यात येत असून आपण सजग राहिले पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झरवळे, आमदार सुनिल शेळके, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हनुमान चालिसेवरून टीका

पवार म्हणाले, हनुमानाचा जन्म भारतात झाला, मात्र कोण म्हणतो उत्तर प्रदेशात झाला, कोण म्हणतो कर्नाटकात झाला, कोण म्हणतो महाराष्ट्रात झाला. मारुतीराया यांना आपण वंदन करतो आणि ते केव्हाच वर गेले असून त्यांच्या जन्माच्या ठिकाणाबाबत सध्या वाद करून काय मिळणार आहे. हनुमान चालीसा म्हणा असे काही जण म्हणतात.. पण ती आपल्या घरी म्हणा, दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्यात काय अर्थ आहे. यापूर्वी कुठे भोंगे वाजत नव्हते का..वारकरी संप्रदायाचे आपण लोक असून या प्रश्नांमुळे कीर्तन-प्रवचन, जागरण गोंधळ, काकड आरती अशा अनेक कार्यक्रमांवर ही ठराविक वेळेनंतर मर्यादा आले आहेत.

भावनिक मुद्द्यांना हात घालताय

विकासाच्या मुद्द्यावर मते मिळत नसल्याने, भावनेला हात घालून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. मध्यंतरी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला करण्याचा प्रकार घडला. शरद पवार हे वेगवेगळ्या समस्येतून मार्ग काढण्याचा नेहमी प्रयत्न करतात. जातीय सलोखा टिकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांचा काही संबंध नसताना घरावर नाहक हल्ला केला गेला. देशापुढे महागाई, बेरोजगारी हे प्रमुख प्रश्न असून त्याबाबत आपण संघर्ष केला पाहिजे.

चौकट

मतांचा बोझा माझ्यावर आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी सकाळी सहा वाजल्यापासून कामांना सुरुवात करतो. ही गोष्ट अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवडत नाही. काहीजण इतक्या लवकर उठून हे का काम करतात असे म्हणतात. मात्र, लोकांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला निवडून दिले असून त्यांची कामे करणे करीता मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. माझ्या पाठीवर त्यांच्या मताचा बोझा असतो. जनतेचा पैसा विकास कामांना योग्यप्रकारे खर्च झाला पाहिजे या दृष्टीने मी नेहमी प्रयत्नशील असतो.

बातम्या आणखी आहेत...