आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Son Along With Hassan Mushrif, Commits Money Laundering Of Rs 150 Crore, Kirit Somaiya's Complaint To Income Tax Department | Marathi News

राष्ट्रवादीवर निशाणा:हसन मुश्रीफांसह मुलगा, जावयाने केले 150 कोटींचे मनी लाँड्रिंग, किरीट सोमय्यांची आयकर विभागाकडे तक्रार

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचा मुलगा नावीद हसन मुश्रीफ, जावई मतीन मंगोली व सरसेनापती संताजी घाेरपडे साखर कारखाना व इतरांनी माेठ्या प्रमाणात फसवणूक करून वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत १५० कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुणे अायकर विभागाकडे शुक्रवारी केली.

सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्या कोट्यवधींच्या बेनामी कंपन्यांबाबतची माहिती आयकर विभागास दिली आहे. मुश्रीफ यांनी ४७ कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग केले आहे. बेनामी संपत्ती या कंपन्यांत आली असून ही चाैकशी पुढे गेली तर १०० पेक्षा अधिक कंपन्या आढळून येतील. ही सर्व बेनामी संपत्ती जप्त केली पाहिजे. मनी लाँड्रिंग झाल्यामुळे याबाबत कारवाई आयकर विभाग, ईडी करणार तर बाेगस शेल कंपन्यांतून पैसा आल्याने चाैकशी केंद्रीय कंपनी मंत्रालयही करणार आहे. या काळ्या पैशांची चाैकशी आतापर्यंत सरकारने का केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

सोमय्यांनी दिली मुश्रीफांच्या कंपन्यांची यादीच
मुश्रीफांच्या कंपन्यांविरोधात केंद्राची न्यायालयात याचिका

हसन मुश्रीफ कुटुंबाच्या वेगवेगळ्या कंपन्यांविरोधात भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने फसवणूक, फाेर्जरी, शेल कंपन्यांशी केलेल्या व्यवहाराबाबत पुण्यातील सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली असून आता त्यावर सुनावणी सुरू होऊन येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कारवाई होणार, असेही सोमय्या यांनी सांगितले. कंपनी कायदा सेक्शन ४४७ तसेच फाैजदारी प्रक्रिया कायदा सेक्शन २५६ च्या अंर्तगत चाैकशी व कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश द्यावे, अशी विनंती भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने केली आहे. सोमय्या म्हणाले, १२०० कोटींच्या जरंडेश्वर कारखान्याची मालकी अजित पवार परिवाराशी संलग्न गुरू कमाेडिटीकडे आहे. या कारखान्याची खरी मालकी या भागातील २७ हजार शेतकऱ्यांची असून पवारांनी कारखाना गैरमार्गाने ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे पवारांची त्यावरील मालकी जाऊन शेतकऱ्यांची कारखान्यावर भविष्यात मालकी येईल, असेही ते म्हणाले.

..तर सोमय्यांची हत्तीवरून मिरवणूक : मुश्रीफ
किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळवलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आव्हान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे सभेत मंत्री मुश्रीफ बोलत होते.

हसन मुश्रीफांच्या कंपन्यांत असा झाला घाेटाळा
*रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस प्रा.लि.
: ४ कोटी रुपये
*माउंट कॅपिटल प्रा.लि.
: ७ कोटी रुपये
*मरुभूमी फायनान्स डेव्हलपर्स प्रा.लि.
: १६ कोटी
*सर सेनापती शुगर्स एलएलपी :
९.७५ कोटी
*नेक्स्टजन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एलएलपी
: ४० कोटी रुपये
*युनिव्हर्सल ट्रेडिंग कंपनी (कागल) एलएलपी -
: ५ कोटी रुपये

बातम्या आणखी आहेत...