आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:सांगलीमध्ये पैसे न दिल्याने मुलाने आईला केली बॅटने बेदम मारहाण

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खर्च करण्यासाठी पैसे न दिल्याने शोभा सुभाष बागडी (३५, रा. मरगुबाई मंदिरासमोर, सांगली) यांना त्यांच्या मुलाने लाकडी बॅटने मारहाण केली. याप्रकरणी मुलगा आकाश (२४) याच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आकाश सायंकाळी घरी आला. त्याने आई शोभा यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यावेळी आकाशने बॅट त्यांच्या डोक्यात घातली. यात त्या रक्तबंबाळ झाल्या. त्यानंतर तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.