आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Son in law Along With Two Sons Withdrew 46 Lakh Rupees From Each Other After Taking The Signature Of The Old Mother, A Case Has Been Registered In The Mundhwa Police In Pune.

गुन्हा दाखल:वृद्ध आईच्या सह्या घेत दाेन मुलांसह सुनांनी परस्पर काढले 46 लाख रुपये, पुण्यातील मुंढवा पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन मुलांसह सुनांनी वृद्ध आईचा विश्वास संपादन करून तिच्या सह्या घेऊन बँक खात्यातून ४६ लाख रुपये काढून घेतल्याची घटना पुण्यात उघडकीस आली. याप्रकरणी वृद्धने मुलांसह सून व नातवांविराेधात मुंढवा पाेलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुम मारुती टिळेकर (८२, रा.केशवनगर, मुंढवा, पुणे) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली अाहे. त्यानुसार बाळासाहेब मारुती टिळेकर, मिलिंद मारुती टिळेकर या मुलांसह सून सुनीता बाळासाहेब टिळेकर, स्वाती मिलिंद टिळेकर व नात अक्षदा देवकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कुसुम टिळेकर यांना मुले आणि सुना विचारत नाहीत. मात्र, काही दिवसांपूर्वी आपल्या सासूला माहेरहून मोठी रक्कम मिळणार असल्याचे सुनांना समजले होते. त्यामुळे सुनांनी आपल्या पतींसह सासूकडे अचानक जाणे-येणे वाढवले. विश्वास संपादन करून त्यांनी बँकेतून पैसे काढले.

वृद्धेला माहेरहून मिळाला होता संपत्तीमध्ये मोठा वाटा कुसुम यांना माहेरच्या संपत्तीचा ४६ लाख रुपयांचा वाटा मिळाल्यानंतर सर्वांनी कुसुम यांच्या सह्या घेऊन बँकेतून रक्कम काढून घेतली. कुसुम यांना हा प्रकार समजताच त्यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...