आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:सोनोग्राफी सेंटरच्या डाॅक्टरला कोरोना, डॉक्टरची पत्नी, भाऊ यांच्यासह 31 गावांतील 143 गर्भवती महिला क्वाॅरंटाइन

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सेंटरमधील दुसऱ्या डॉक्टरचे नमुने निगेटिव्ह आले आहेत

अहमदनगर रस्त्यावरील शिक्रापूर येथील एका सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्ट डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांत डाॅक्टरने तपासणी केलेल्या ६९ गर्भवतींसह परिसरातील ३१ गावांच्या १४३ गरोदर महिलांना होम क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे. या कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे डॉक्टराला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गेल्या पाच दिवसांत सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलांना क्वाॅरंटाइन करावे लागले आहे. 

डॉक्टरची पत्नी, त्याचा भाऊ यांनाही क्वॉरंटाइन करण्यात आले मात्र सेंटरमधील दुसऱ्या डॉक्टरचे नमुने निगेटिव्ह अाले आहेत. या सोनोग्राफी सेंटरमध्ये ६९ गर्भवती महिला डॉक्टरच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या होत्या, तर उर्वरित ७४ महिला सोनोग्राफी सेंटरमध्ये आल्या होत्या. यामुळे   शिक्रापूर परिसरातील सर्व १४३ महिलांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे सीईअाे अायुष प्रसाद यांनी सांगितले अाहे. या प्रकरणानंतर शिक्रापूर परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात अाले असून पाेलिसांनी परिसर पूर्णत: लाॅकडाऊन केला अाहे. अाराेग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले की, गर्भवती महिलांचे स्वॅब नमुने तपासणीकरिता प्रयाेगशाळेत पाठवले अाहेत. अद्याप त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. तसेच डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध घेणे सुरू अाहे. 

बातम्या आणखी आहेत...