आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण:धमाक्यांचा आवाज ऐकला अन् लोकांच्या सुटकेसाठी मी धावत खाली आले, बेकरीजवळील डॉक्टरची साक्ष

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षीदारांची साक्ष व उलटतपासणीस सुरूवात. - Divya Marathi
साक्षीदारांची साक्ष व उलटतपासणीस सुरूवात.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात मुख्य आरोपी व ’इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याच्या विरोधात विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज मंगळवारी जर्मन बेकरीजवळच दवाखाना असलेल्या एका महिला डॉक्टरची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. मी बॉम्बस्फोटांच्या धमाक्यांचा आवाज ऐकल्यानंतर धावत खाली गेले आणि लोकांची सुटका करण्यासाठी मदत करु लागले. मात्र, मी प्रत्यक्ष घटना घडताना पाहिले नाही, अशी साक्ष या महिला डॉक्टरने मंगळवारी न्यायालयात दिली आहे.

१७ जणांचा मृत्यू, ५६ जखमी

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि ५६ जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात एटीएसने केलेल्या तपासात भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे सीसी टीव्हीवरून निष्पन्न झाले होते. त्यानंतर यासीन भटकळ, मिर्झा हिमायत बेग यांच्यासह सात जणांवर ‘एटीएस’ने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत त्यांना अटक केली होती.

साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल

या बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सोमवारी सर्व साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल करून घेण्यात आले. यासीन भटकळतर्फे बाजू मांडण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ॲड. एस. व्ही. रणपिसे आणि ॲड. यशपाल पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात भटकळ याच्या सहभागाबाबत बचाव पक्षातर्फे साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत जर्मन बेकरीच्या मालक स्मिता खरोसे यांच्यानंतर एका महिला डॉक्टरांची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...