आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहूत उपमुख्यमंत्र्यांचे भाषण का नाही?:पीएमओमधून भाषणाला परवानगी नव्हती; देहू संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचे स्पष्टीकरण

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान कार्यालयाकडून जो प्रोटोकॉल आला त्यानुसार शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रम झाला. पंतप्रधानांना लवकर मुंबईला जायचे होते. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेतला. यात कोणी राजकारण आणू नये असे मत देहू संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील कार्यक्रमावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात मोदीं यांच्या शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करणे अपेक्षित असताना त्यांनी भाषण केले नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडूनच अजितदादांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यानंतर थेट मोदींनी भाषण केले. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावना व्यक्त केली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार अजित पवारांच्या कार्यालयातून याबाबत पंतप्रधान कार्यलयाकडे भाषणाबाबत कळवले होते. पण पीएमओमधून भाषणाला परवानगी देण्यात आली नाही.

यापूर्वीच्या भाषणामुळे पवार अडचणीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सहा मार्च रोजी पुण्यातील मेर्टोचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान यांच्या समोर बोलताना राज्यपाल यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे यावेळी त्याबाबत दक्षता घेत त्यांचे भाषण टाळले असावे अशी चर्चा रंगली आहे.

बातम्या आणखी आहेत...