आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:पायावर थुंकल्याने तरुणाचे नाक फोडले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बालेवाडी हायस्ट्रीटसमाेरील मेमाेज दुकानासमाेरील फुटपाथवर एकाने पायावर थुंकल्याचे म्हणत तरुणाच्या नाकाचे हाड मोडल्याची घटना घडली. माहितीनुसार, ३० ऑक्टाेबर राेजी रात्री विपुल नाथ (३१, रा.बालेवाडी, पुणे) हा तरुण पायी चालत जात हाेता. त्या वेळी त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या दाेन अज्ञात ३० वर्षे वयाेगटातील तरुणांनी त्यास अडवून ‘तू आमच्या पायावर थुंकला काॽ’ असे म्हणत त्याच्या ताेंडावर व नाकावर बुक्के मारले. त्यात विपुलच्या नाकातून रक्त येऊन नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. दुसऱ्या आराेपीने तक्रारदारास हाताने व लाथेने मारून शिवीगाळ केली.

बातम्या आणखी आहेत...