आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह वक्तव्य:राज्यपाल कोश्यारी यांच्याविरुद्ध बंदला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील विविध संघटनांनी व पक्षांनी मंगळवारी पुण्यात बंद पाळला. पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षाचालक, हमाल पंचायत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहनदादा जोशी आदी सहभागी झाले. हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले. असे असताना त्यांचा सन्मान व्हावा हे सांगण्याची आज वेळ येते ही शोकांतिका आहे. नूपुर शर्मांवर जशी शिस्तभंगाची कारवाई केली, तशीच ती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. मात्र, त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, हा प्रश्न विचारला असता उदयनराजे भोसले यांनी बोलण्याचे टाळले.

बातम्या आणखी आहेत...