आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Srimanta Dagdusheth Halwai Ganapati Seated In The Original Temple Enters The Temple From The Festival Pavilion For Immersion Procession; The Immersion Will Take Place On Saturday Morning

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विराजमान:मिरवणुकीसाठी मंडळाकडून जोरदार तयारी; शनिवारी पहाटे विसर्जन होणार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाची सांगता मिरवणूकसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातून मूळ मंदिरामध्ये विराजमान शुक्रवारी सकाळी झाला आहे. दगडूशेठ गणपती गणेशोत्सवाच्या काळात लाखो गणेश भक्तांनी दर्शन घेतले असून शुक्रवारी रात्री दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत आकर्षक विद्युत रोशनी केलेल्या रथातून मार्गस्थ होणार असून शनिवारी पहाटे त्याचे विसर्जन होईल.

दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमद्धे सकरण्यात आलेले श्री स्वानंददेश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक यंदा निघणार आहे. एलईडी व मोत्याच्या रंगाच्या दिव्यामद्धे हा रथ सकरण्यात आला आहे.

मिरवणुकीत अग्रभागी देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन असेल. पुण्यातील महत्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे असेलला आणि स्वच्छेतेचा संदेश देणारा जय गणेश स्वच्छता अभियान रथ असणार आहे. स्वरूप वर्धिणी संस्थेचे पथक, दरबार व प्रभात ही बॅंड पथके आणि केरळचे चंडा या पारंपरिक वाद्य वादकांचा चमू मिरवणुकीमध्ये असेल.

अखिल मंडई मंडळ

अमोघ त्री शक्ति नाग रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाणणाची विसर्जन मिरवणूक निघेल. विशाल ताजनेकर यांनी रथाचे कला दिग्दर्शन केले असून विविध रंगी प्रकाश झोतात रथ उजळून निघेल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा सनई चौघड्याचा गाडा, गंधर्व बॅंड तसेच शिवगर्जना वाद्य पथकसह ढोल ताशा पथक सहभागी होतील.

फूट लांब व 14 फूट रुंद असलेल्या या विसर्जन रथाची उंची 32 फूट असणार आहे. शेषनाग हा 19 फुटांपर्यंत राहणार असून, त्यामागे 11 फुटी त्रिमूर्ती असणार आहेत. हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे 30 फुटांचा रथ 11 फुटांनी कमी होऊन 19 फूट होऊन रथ मेट्रोच्या पूलाखालून सहजरीत्या पार होईल. या रथावर विविध लाईट्स लावण्यात येणार आहेत. मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचा सनई चौघडा त्यामागे गंधर्व बँड असणार आहे. तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी

प्रथेप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती रथामद्धे बसून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंडई येथे टिळक पुतळ्याजवळ विराजमान होतील. तेथून पुढे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुक सर्वसाधारणपणे रात्री साडे अकरा वाजता निघणार आहे. श्री राम, नाद ब्रम्ह, सर्ववादक, समर्थ प्रतिष्ठान, यांची पथके असणार आहे. याशिवाय शंख वादन आणि मर्दानी खेळ सादर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...