आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दहावीचा निकाल:राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार, यंदा लॉकडाऊनमुळे विलंब

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल

इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे, अशी घोषणा राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी मंगळवारी केली. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे यंदा दहावी परीक्षेतील भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. तसेच दीर्घ लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीचे काम विलंबाने झाले. रद्द केलेल्या पेपरच्या गुणप्रदानाचा निर्णय होण्यासही कालावधी गेला. त्यामुळे यंदा निकाल जाहीर करण्यासही उशीर झाला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळांवर उपलब्ध होईल, असे मंडळाने कळवले आहे.

हे लक्षात ठेवा :

गुरुवारपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. गुण पडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान, तर छायाप्रतींसाठी १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

या ऑनलाइन वेबसाइट्सवर निकाल उपलब्ध

> www.mahresult.nic.in (येथे निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल)

> www.sscresult.mkcl.org

> www.maharashtraeducation.com

> www.mahahsscboard.in (येथे शाळांना एकत्रित निकाल मिळेल)