आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक विषयात काठावर पास:पुण्यातील बहाद्दराला 10वीच्या परीक्षेत सर्व विषयांत '35' गुण; पोलिस होण्याची इच्छा

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीत जास्तीत जास्त गुण मिळावे यासाठी सर्वच विद्यार्थी आणि त्यांचे पालक अत्यंत सजग असतात, कमी गुण मिळाले तर नाराज होणारेही कमी नाहीत पण अशाच परीक्षांत काही अफलातून गोष्टीही घडतात असाच प्रकार एका विद्यार्थ्याच्या बाबतीत घडला. त्याने मिळवलेल्या गुणांची सर्वत्र चर्चाच चर्चा सुरु असून सर्वच विषयात या विद्यार्थ्यांने 35 गुण मिळवले त्याच्या यशाने मित्रांनीही त्याला खांद्यावर घेत आनंद व्यक्त केला.

पुण्यात आज दहावीच्या निकालाच्या जल्लोषात विद्यार्थी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. तर काहींनी 90 ते 95 टक्के मिळवले आहेत. मात्र, पुण्यात एका पठ्याने मात्र, वेगळाच विक्रम केला आहे. तुम्ही म्हणाल 10 वीच्या परीक्षेत विक्रम कसे काय शक्य आहे. पण त्याने हे शक्य करून दाखवले आहे.

या पोराने चक्क सर्व विषयांत 35 गुण मिळवले आहेत. एवढेच नाही तर 35 टक्के घेऊन तो पासही झाला आहे. मी खूप अभ्यास केला होता. चांगले मार्क पडतील अशी अपेक्षा होती. पण, मार्क मिळाले नाही. असे असले तरी मी माझ्या निकालावर खुश आहे, असे त्याचे म्हणणे आहे.

शुभमला आश्चर्याचा धक्का

शुभम जाधव असे या ‘मार्क वीरा’चे नाव असून तो पुण्यातील गंजपेठेत राहायला आहे. शुभमची घरची परिस्थिती तशी बेताची आहे. वडील कंपनीत कामाला आहेत. तर आई धुणी भांडी करते. शुभमला नववीमध्ये 60 टक्के मिळाले. दहावीतही चांगले मार्क मिळवण्यासाठी शुभमने रांत्रदिवस अभ्यास केला. त्याला चांगल्या मार्कांची अपेक्षा होती. शुक्रवारी सकाळी जेव्हा निकाल लागला, तेव्हा त्याला आश्चर्याचा जणू धक्काच बसला. त्याला एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क सर्व विषयांत 35 गुण मिळाले. तसेच 35 टक्के घेऊन उत्तीर्णही तो झाला. सुरुवातीला त्याला कमी गुण मिळाल्यामुळे दुख: झाले. पण, पास झाल्याचा आनंदही त्याला होता .त्याच्या या मार्कांबद्दल त्याला विचारले असता शुभम म्हणाला की, मी चांगला अभ्यास केला. रोज मी रात्र जागून अभ्यास करायचो. त्यामुळे मला चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती. पण, फक्त 35 टक्केच मिळाले. मार्क कमी असल्याचे दुख: आहेच पण पास झाल्याचा आनंदही आहे असे शुभम म्हणाला.

शुभमला पोलिस व्हायचंय

या मार्कांच्या जोरावर तुला काय व्हायचे आहे असे विचारल्यावर शुभम म्हणाला, मला कॉमर्सला जायचे आहे. भविष्यात काय बनायचे असे काही निश्चित नाही. पण पोलिस बनायला मला आवडेल असे शुभम म्हणाला. त्या दृष्टीने तयारी करेन असा दृढविश्वासही त्याने दाखवला.

12 वीत चांगले गुण मिळवणारच

दहावीत 35 टक्के मिळवून शुभम खचला नाही. त्याने बारावीत चांगले मार्क मिळवण्याचा दृढनिश्चय केला आहे. आता मार्क जरी कमी मिळाले असले तरी मी पुन्हा चांगला अभ्यास करीन आणि बारावीत खूप चांगले मार्क मिळवीन असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. शुभमच्या मित्रांनाही त्याने कमावलेल्या गुणांचा सार्थ अभिमान आहे.

बातम्या आणखी आहेत...