आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी खासगी क्लासेस सुरू करा : अॅड. आंबेडकर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 विद्यार्थ्यांऐवजी 40 विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी - आंबेडकर

कोरोनामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाच्या काळात शाळा -महाविद्यालये सुरू करणे शक्य नाही हे आम्ही समजू शकतो. मात्र, त्याला कुठेना कुठे सुरुवात करावी लागेल. त्यासाठी नियमावली तयार करून राज्यातील सर्व खासगी क्लासेस सुरू करावेत. एकदा का हे क्लासेस सुरू झाले की शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास वेळ लागणार नाही. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.