आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टार्टअप फॉर रिसर्च इन ऑपरेशनल टेक्नॉलॉजीज (एसआरओटी) इन्क्युबेशन सेंटर, पुणे व्हीआयआयटी पुणे येथे २७ जानेवारी २०२३ रोजी स्थापन करण्यात आले. हे संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सेवा इनोव्हेशन आणि इंडिजनायझेशन सेंटर (जेएसआयआयसी) अंतर्गत आहे. हा स्टार्टअप ब्रॅक्ट्सच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी), पुणे-४८ आणि जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आहे.
भारतातील पहिले एसआरओटी केंद्र आहे. जेएसआयआयसी, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचे हे संयुक्त सहकार्य अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. स्टार्ट-अप फॉर रिसर्च इन ऑपरेशनल टेक्नॉलॉजीसोबत विश्वकर्मा इनक्युबेशन अँड इनोव्हेशन रिसर्च पार्कचे उद्घाटन व्हीआयआयटी येथे २७ जानेवारी २०२३ रोजी प्रमुख पाहुणे एअर कमोडोर अभिजित सराफ व्हीएसएम, एअर ऑफिसर कमांडिंग ९ बीआरडी यांच्या शुभ हस्ते झाले. ज्येष्ठ लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, पीव्हीएसएम, व्हीएसएम आणि लेफ्टनंट कर्नल अनूप मिश्रा, व्हीएसएम, संचालक, जेएसआयआयसी, श्री भरत अग्रवाल, विश्वकर्मा संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि अध्यक्ष (व्हीआय), सचिन नाईक, सीईओ. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड, युसूफ इनामदार, संचालक-उद्योग, डॉ. विवेक देशपांडे, संचालक. या उद्घाटन सोहळ्याला या संस्थांचे प्रमुख, डीन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संचालक डॉ. विवेक देशपांडे यांनी समारोपाच्या भाषणात संस्थेच्या एसआरओटीमध्ये सक्रिय योगदानाची ग्वाही दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.