आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SSC- HSC विद्यार्थ्यांठी महत्त्वाची बातमी:पुरवणी परीक्षचे वेळापत्रक जाहीर; 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार पेपर

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या दोन्ही परीक्षांमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परिक्षा 21 जूलै ते 12 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे.

20 जूनपासून अर्ज भरणे सुरू

पुरवणी परीक्षांसाठीचे अर्ज विद्यार्थ्यांनी 20 जूनपासून राज्य बोर्डाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ऑनलाइन स्वरुपात पाठवायचे आहेत. त्याची स्वतंत्र नियमावली आणि आवश्यक सूचना, तसेच अर्ज भरण्याची पद्धती याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन संकेतस्थळावर देण्यात आले आहे. पुरवणी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, याबाबतची सूचना बोर्डाकडून लवकरच कळवली जाईल.

शिक्षण मंडळाची माहिती

मात्र, यंदा लेखी परीक्षेआधी आणि लेखी परीक्षेनंतरही प्रात्यक्षिक परीक्षा सोयीनुसार घेतल्या जातील कारण राज्याच्या विविध भागांत जुलै - ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. ते गृहीत धरुन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...