आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांचे प्रश्न जेव्हा पुरुष समजून घेतील आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा महिलांचे निम्मे प्रश्न संपलेले असतील. राज्य महिला आयोग म्हणजे पुरुषांच्या विरोधात असा अनेकांचा समज होतो, परंतु आमची लढाई समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे. अन्याय करणा-यांपेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो. प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला कोणी येईल ही भावना महिलांनी काढून टाका. स्वत:च्या आयुष्याची लढाई स्वत:च लढाईची आहे. मातीत घट्ट पाय रोवून उभे रहा आणि संकटांचा सामना करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस, न-हे च्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पुढाकाराने 'सॅनिटरी नॅपकिन बँक आपल्या आरोग्यासाठी' या उपक्रमांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी रुपाली चाकणकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्यविभागाच्या डॉ.प्रिती सकपाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता लाड, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, जंगलाच्या मध्यभागात राहणारे आदिवासी शिक्षणाने किंवा आर्थिकदृष्ट्या कमी असतील, परंतु तेच मला ख-या अर्थाने श्रीमंत वाटले, कारण मुलीच्या जन्माचे तीन दिवस स्वागत या आदीवासी पाड्यांवर केले जाते. मी पुण्याचीच आहे. पुणेकर म्हणून जसा अभिमान वाटतो तशी खंत देखील वाटते. आदिवासी पाड्यांवर मुलींचे प्रमाण मोठे आहे, त्यापेक्षा कमी प्रमाण पुणे शहरात आहे. आजही समाजात वंशाला वारसदार मुलगा हवा असतो, यासाठी मुलीची हत्या केली जाते. समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे. पुण्यातचयाची उदाहरणे नुकतीच समोर आली आहेत.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ज्या महिलांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यांची माहिती मिळाल्यास जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सहकार्य केले जाईल. महिलांची प्रगती होईल यासाठी समाजाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.