आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्षयरोग निर्मुलन कार्यक्रम हा जिल्हा, तालुका व गाव पातळीवर अधिक सक्षम करण्यासाठी राज्यस्तरीय क्षयरोग अंमलबजावणी कक्ष (वॉररूम)ची उभारणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे क्षयरोगासाठी राज्यस्तरीय वॉर रूम तयार करणारे महाराष्ट्र देशातील पाहिले राज्य ठरले आहे. आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते पुण्यात उभारण्यात आलेल्या क्षयरोग अंमलबजावणी कक्षाचे (वॉर रूम) उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबेडकर, सहसंचालक डॉ. रामजी अडकेकर, सी.एच.आई फाउंडेशन व बी.एम.जी.एफ फाउंडेशनचे डॉ.संदीप भारस्वाडकर, डॉ.समीर कुमटा आदी उपस्थित होते. या वॉर कक्षाद्वारे क्षयरोग निर्मूलन बाबत भौतिक सुविधा आणि इतर गोष्टींची संबंधित आकडेवारी तात्काळ उपलब्ध होणार आहे. नियमित विश्लेषण तसेच पाठपुरावा करून, प्रभावीपणे कार्य होण्यासाठी याची मदत होईल. क्षयरोग कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती, सूचना, निदानात्मक सुविधा, उपचारात्मक सुविधा, डी.बी.टी योजना यांच्या विषयी रोजच्या रोज माहिती मिळून यात येणाऱ्या अडी-अडचणींविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
नियोजनासाठी मोठी मदत
निक्षय अहवाल व व्यवस्थापन अहवाल मिळवणेही यामुळे अधिक सोपे होणार आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निगडित सर्व डेटा तयार करण्यात येऊन कार्यक्रमात येणाऱ्या अडी-अडचणी, नियोजन व सहयोगी विचारमंथन करून त्यातून कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनासाठी याची मोठी मदत होणार आहे.
कामात येणार गती
यात खाजगी, शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यांचा आढावा घेऊन त्यानुसार कार्यप्रणाली अद्यावत करण्यावर भर दिला जाणार आहे. या कार्यप्रणालीद्वारे जिल्हा व तालुक्यांशी थेट संवाद होऊन दैनंदिन कामकाजात गतिमानता येणार असून गुणवत्ता व सुधार करण्यासाठीच्या कृती करण्याकडे कल निर्माण होण्यास मदत होईल. क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट 2025 पर्यंत साध्य होण्यासाठी शासकीय, खाजगी आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र प्रयत्न करावा, अशी भावना यावेळी डॉ रामास्वामी यांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.