आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी विभागात भ्रष्टाचाराची वाळवी:राज्य कर निरीक्षक अधिकारी महिलेला 2 हजारांची लाच घेताना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर निरीक्षक महिला दाेन हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. हि कारवाई आज पुणे येथे करण्यात आली. एका प्रकरणात गाेठविण्यात आलेले बँक खाते पुन्हा सुरु करुन क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांनी लाच स्विकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ज्याेत्सना रामचंद्र काेरडे (वय-35) असे लाच घेणाऱ्या संशयित महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे.

एसीबीकडे याप्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली. तक्रारदार यांचे गाेठवलेले बँक खाते पुन्हा सुरु करुन त्यांना क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर निरीक्षक ज्याेत्सना काेरडे यांना त्यांना दाेन हजारांची लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच मागितल्याची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचत पथकाने जोत्स्ना कोरडे यांना अटक करण्यात आली आहे.

एसीबीचे पाेलिस अधीक्षक राजेश बनसाेडे, अपर पाेलिस अधिक्षक सूरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक ज्याेती पाटील, हवालदारअंकुश आंबेकर, हवारलदार पूजा डेरे,चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...