आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:द युनिक अकॅडमीतर्फे यूपीएससी यशवंतांचा सत्कार व अनुभव कथन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या परीक्षेत द युनिक अकॅडमीतून मार्गदर्शन घेतलेल्या ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अंतिम निकालात स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाने द युनिक अकॅडमीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. दरवर्षी निकालातील यशवंतांच्या सत्काराचा कार्यक्रम द युनिक अकॅडमीतर्फे होत असतो. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षे सत्काराचा कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही. या वर्षी सोमवार, ६ जून रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट पुणे येथे हा सत्कार सोहळा होईल.

पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक आयएएस राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होईल. याच कार्यक्रमात तुकाराम जाधव लिखित “भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया” या पुस्तकाचे प्रकाशनदेखील होणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके व अभ्यास साहित्य ५० टक्के सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...