आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात राज्यभरात भाजपचे आंदोलन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक हाेते, असे वक्तव्य विधानसभेत केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात अनेक जिल्ह्यांत आंदाेलन करण्यात आले. भाजयुमाे पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात डेक्कन परिसरातील खंडोजी बाबा चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे आंदोलन करण्यात आले.

पुणे येथील आंदाेलनादरम्यान मुळीक म्हणाले, अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा अपमान केला आहे. संभाजी राजे यांनी आयुष्यभर धर्म जपला. त्यांचा औरंगजेबाने अमानुष छळ केला. अनेक जणांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. परंतु राजांनी धर्म सोडला नाही. औरंगजेबाकडून अजित पवार आणि त्यांचा पक्ष प्रेरणा घेत आहे. त्यामुळे त्यांना इतिहासात नाक खुपसण्याची गरज नाही. राजे यांनी धर्मासाठी बलीदान केल्याने त्यांची प्रेरणा देशभरातील लाखो लोक घेत आहेत. औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरे जाणीवपूर्वक पाडली. लोकांवर अत्याचार केले. औरंगजेबाच्या विरोधात राजे आयुष्याच्या शेवटपर्यंत लढत राहिले. पण मतांच्या राजकारणासाठी पवार त्यांच्या नावाचा दुरुपयोग करत आहे.

यावेळी भाजप पदाधिकारी धनंजय जाधव, आदित्य माळवे, राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, निवेदिता एकबोटे, प्रतीक देसरडा, दीपक पवार, ओंकार केदारी, महेश पवळे, अपूर्व खाडे, सुनील मिश्रा, भैरवी वाघ, प्रशांत सुर्वे उपस्थित होते. पवारांना धरणवीर पुरस्कार देऊ : विखे : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसतील तर भाजपतर्फे अजित पवारांना ‘धरणवीर’ पुरस्कार दिला जाईल, अशी टीका टीका भाजपचे खा.सुजय विखे पाटील यांनी केली.

पुण्यात भाजयुमोचे आक्रमक आंदोलन, पवारांविरोधात घोषणाबाजी औरंगजेब क्रूर नव्हता : आव्हाड अजित पवार यांच्या वक्तव्यावरून वादळ उठले असतानाच राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचे मंदिरही तोडले असते, असे वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला. संभाजी महाराजांबद्दलचा वाद निष्कारण काढला जात आहे. शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराज गादीवर बसले. मराठा व्यापक संकल्पना होती. रयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज . यामुळे ते एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही. इतिहासकारांनी त्यांच्याबद्दल चांगले लिहून ठेवले आहे. स्त्रीप्रधान संस्कृतीला मानणारे संभाजी महाराज मोठे अभ्यासक होते. कुठल्या इतिहासकाराने त्यांना धर्मवीर म्हणले नाही, असे आव्हाड पुढे म्हणाले.

अमरावती व बारामतीतही केले कार्यकर्त्यांनी आंदोलन अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत भाजयुमोने राजापेठ उड्डाणपुलावर मोर्चा काढून घोषणाबाजी करत निषेध केला गेला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या फोटोला चपला मारून, बॅनर फाडून निषेध करण्यात आला. बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. भाजपच्या वतीने भिगवन चौकात हे आंदोलन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...