आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरणारे अल्पवयीन ताब्यात:पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरून विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघा अल्पवयीनांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन महागड्या बॅटर्‍या, दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. त्यांनी आंबेगाव आणि धनकवडी परिसरातील महागड्या गाड्यांच्या बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली.

भारती विद्यापीठ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ आणि उपनिरीक्षक धीरज गुप्ता हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आंबेगावमध्ये दोघे अल्पवयीन बॅटर्‍या विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व आशिष गायकवाड यांना मिळाली. पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, अमर भोसले, शैलेश साठे, रविंद्र चिप्पा, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांनी केली.

हटकल्याने गुन्हेगारांच्या टोळक्याकडून घरावर दगडफेक..

घरासमोर भांडण करत असल्यावरून त्या तरुणांना हटकल्यानंतर सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने तरुणाच्या घरावर दगडफेक तुफान गोंधळ घातला. या तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनिकेत मोडक (19) याने तक्रार दिली आहे. त्यावरून रोहन इंगळे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वडकीमधील वलवा वस्तीत घडली आहे.

दोन दिवसांपूर्वी यातील ऋषभ नावाचा मुलगा व काहीजण तक्रारदार तरुणाच्या घरासमोर भांडण करत होते. यावेळी तरुणाने त्यांना घरासमोर भांडण नका करू. इथून जा असे सांगितले होते. त्याचा राग आल्याने या तरुणांच्या टोळक्याने मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तरुणाच्या घरी येउन दगडफेक केली. तर या तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...