आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:सावत्र मामाचा भाचीवर बलात्कार, जिवे मारण्याची धमकी; आरोपी अटकेत

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेंढवा पाेलिस ठाण्याच्या परिसरात रहाणारी १९ वर्षीय मुलगी घरात एकटी झाेपलेली असताना तिच्या सावत्र मामाने घरी येऊन तिच्यावर बळजबरी करत शरीर संबंध ठेवले. तसेच घरातील लाेकांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काेंढवा पाेलिसांनी ३० वर्षीय सावत्र मामाला अटक केली. ही घटना मार्च २०२२ मध्ये घडल्याची तक्रार पीडित तरुणीने पाेलिसांना दिली आहे. तरुणीने सावत्र मामाला प्रतिकार केला असता त्याने याबाबत काेणाला सांगितल्यास घरातील लाेकांना मारून टाकण्याची धमकी दिली हाेती. त्यामुळे पीडितेने घाबरून लवकर तक्रार केली नव्हती. परंतु मामा तिला वारंवार धमकावत असल्याने अखेर तिने पाेलिसांत धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...