आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पोलिस पथकावर दगडफेक:मध्यरात्री टपरी बंद करायला गेलेल्या ग्रस्ती पथकावर टोळक्याने केली दगडफेक

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारजे माळवाडी परिसरात रात्रगस्त घालत असलेल्या पाेलीसांनी एका पाण टपरी समाेर गर्दी दिसल्याने पान टपरी बंद करत गर्दी हटविण्यासाठी थांबले. त्यावेळी आठ ते दहा जणांच्या टाेळकल्याने पाेलिसांचे दिशेने दगडफेक करत पसार झाल्याची धक्कादायक घटना 15 डिसेंबर राेजी रात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पाेलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

याप्रकरणी पाेलीस नाईक गाेविंद भारत फड (वय-39) यांनी वारजे पाेलीस ठाण्यात नऊ ते दहा जणांविरुध्द तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगविजय ककाराम वाघमारे (वय-39,रा.वारजे,पुणे), व्यंकटेश प्रमाेद पिलवणकर (19) व अमाेल निलेश पवार असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. त्यांचे साथीदार लाल्या खान, आप्पा लाेंढे, खंडया वाघमारे व इतर तीन ते चार जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दिग्विजय वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. 15 डिसेंबर राेजी रात्री वारजे माळवाडीचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दगडू हाके हे त्यांचे पथका साेबत काेथरुड भागात रात्रगस्त घालत हाेते. त्यावेळी गणपती माथा येथे राॅयल पान शार्प समाेर गर्दी दिसल्याने त्यांनी आस्थापना बंद करुन तेथील गर्दी हटविण्यासाठी थांबले. त्यावेळी पाेलिसांना पाहून संबंधित टाेळक्याने साथीदारांना जमवून पाेलिसांचे दिशेने दगडफेक करुन गल्लीत पळून गेले. पाेलिस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करुन दगफेक केल्याने आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस उपनिरीक्षक एस जवळगी याबाबत पुढील तपास करत आहे.

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कामावरून सुटल्यानंतर रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 43 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना लोहगावमधील पठारे वस्तीवर घडली. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिला 13 डिसेंबरला कामावरून सुटल्यानंतर घरी चालली होती. त्यावेळी पठारे वस्ती परिसरात दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून गळ्यातील 43 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंट चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रत्ना सपकाळे तपास करीत आहेत..

बातम्या आणखी आहेत...