आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक:बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर दगडफेक

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री उदय सामंत हे मंगळवारी दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दौऱ्यात फिरत होते. रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होती. त्याचठिकाणी जवळ बंडखोर नेते तानाजी सावंत यांचे निवासस्थान आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार होते. याकरिता तानाजी सावंत कात्रज परिसरातून जात असताना त्यांना शिवसैनिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत उदय सामंत यांच्या कारची काच फुटली असून या गोष्टीमुळे तणावाची परिस्थिती कात्रज परिसरात निर्माण झाली आहे. ‘गद्दारांना माफी नाही’ असे म्हणत शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी त्यांची गाडी सुखरूपपणे बाहेर काढत त्यांना पुढे नेले. याबाबत उदय सामंत एका वृत्त वाहिनिशी बोलताना म्हणाले, माझी गाडी फोडण्यात आली आहे. हल्लेखोर लोक शिवसेनेचे नसतील, ते दुसरे असतील त्याबाबत तपास झाला पाहिजे. माझी गाडी सिग्नलला थांबलेली असताना हल्ला झाला.

बातम्या आणखी आहेत...