आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदा लागू:राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा लागू होईल : हजारे; इशाऱ्यानंतर लोकायुक्त मसुदा समितीची बैठक

पुणे/पारनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचाराविरोधातील व्यवस्था परिवर्तनाचे पुढचे पाऊल असलेल्या सशक्त लोकायुक्त विधेयकाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. आता राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा लागू होईल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. संयुक्त लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र लोकायुक्त व उपलोकायुक्त अधिनियम १९७१ मध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त मसुदा समितीची बैठक शुक्रवारी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे पार पडली. हजारे यांच्यासह निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, माजी मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त गृह सचिव अनंत लिमये, सामान्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव सतीश वाघोले व माजी सचिव जॉनी जोसेफ, श्याम असावा, संजय पठाडे आदी बैठकीत सहभागी झाले होते.

हजारे यांनी लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठका होत नसल्याने नाराजी व्यक्त करत लोकायुक्तांची नियुक्ती करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, अशी मागणी करत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारने मसुदा समितीची बैठक बोलावली होती. त्यानंतर ही आता बैठक झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाल्या ४ बैठका
फडणवीस सरकारच्या काळात आंदोलन केल्यानंतर स्थापन झालेल्या मसुदा समितीच्या चार बैठका झाल्या होत्या. ठाकरे सरकार आल्यानंतर हजारे यांनी पत्रव्यवहार करून मसुदा समितीच्या बैठकीची मागणी केली होती. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सशक्त लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर दोन बैठका होऊन मुसदा समितीचे कामकाज ठप्प झाले होते.

बातम्या आणखी आहेत...