आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीत नापास झाल्याने आत्महत्या:पुण्यात टोकाचे पाऊल उचलत सहाव्या मजल्यावरून विद्यार्थ्याने मारली उडी

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात बारावीत नापास झाल्यामुळे एका विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निखिल लक्ष्मण नाईक (वय 19)असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ​​​​​​

कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल नाईक हा पुण्यातील गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, गुरुवारी लागलेल्या निकालात तो नापास झाला. या नैराश्यातून त्याने भेलके नगर येथील श्रावणधारा वसाहत या ठिकाणी राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत आत्महत्या केली.

निखिलने उडी मारल्याचे लक्षात येताच त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांनी त्यास रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कोथरूड पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत पुढील तपास कोथरूड पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...