आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:यूपीएससी परीक्षेत चाणक्य मंडल परिवाराचे विद्यार्थी यशस्वी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणेच चाणक्य मंडल परिवाराच्या १७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. ऐश्वर्य वर्मा, सम्यक जैन आणि प्रीतमकुमार यांनी देशात अनुक्रमे चौथा, सातवा आणि नववा क्रमांक मिळवला आहे.

मागील चार वर्षांपासून चाणक्य मंडल परिवारानं दिल्लीतही मार्गदर्शन सुरू केलं आहे. त्याला संपूर्ण भारतभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्यानं चाणक्य मंडलची अखिल भारतीय वाटचाल सुरू आहे. पहिल्या दहात तीन, २० मध्ये ५, ५० मध्ये १४ आणि १०० मध्ये तब्बल २६ विद्यार्थी चाणक्य मंडल परिवारचे आहेत. शुभम भैसरे, वृष्टी जैन, समीक्षा जैन, रामेश्वर सब्बनवाड, अभिजित पाटील, विशाल खत्री, प्रतीक मंत्री, सोहम मांढरे, वैभव काजळे इ. अशा अनेक मराठी चेहऱ्यांचा चाणक्य मंडल परिवारच्या यशात सहभाग आहे. एप्रिल ते मेदरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या आधारे परीक्षेची गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यात एकूण ६८५ उमेदवार निवडले गेले आहेत. ६८५ पैकी १७० पेक्षा जास्त विद्यार्थी चाणक्य मंडल परिवाराचे असून आता ते विविध पदांवर देशाची सेवा करण्यासाठी रुजू होतील.

देशात ७० वा आलेल्या नारायण मालेमपती याने चाणक्य मंडल परिवाराचे आभार मानले आहेत. चाणक्य मंडल परिवार मांडत असलेले विचार मला मनापासून आवडतात, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. शुभम भैसरे, रामेश्वर सब्बनवाड, राज कृष्णा,अंशू प्रिया, प्रीतमकुमार, दीपेशकुमारी, लवीश गर्ग, समीक्षा जैन अशा भारतभरातील अनेक विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडलमध्ये मिळालेल्या मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे

बातम्या आणखी आहेत...