आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाचे पेपर आजपासून:ऑफलाइन परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना मिळणार 15 मिनिटांचा अतिरिक्‍त वेळ

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 20 जूनपासून प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाइनद्वारे होणार आहेत. पहिल्याच दिवशी अभियांत्रिकी, फार्मसी व वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यापीठाने यापूर्वीच परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन परीक्षा विभागाने केले आहे.

अतिरिक्त वेळ मिळणार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना विद्यापीठाच्या परीक्षा लेखी पद्धतीने होत आहे. या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक तासामागे 15 मिनिटांचा अतिरिक्‍त वेळ वाढवून दिला जाणार आहे. नियमित सत्राच्या परीक्षेमधील दोन पेपरमध्ये किमान दोन दिवसांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थी ज्या पॅटर्नमध्ये परीक्षा देणार आहेत, त्याच पॅटर्नमधील प्रश्‍नसंच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सलगच्या दोन पेपरमध्ये एक तासाचे अंतर ठेवण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...