आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ऑडिओ संदेशांच्या मालिकेला यश, पालकांच्या सबलीकरणासाठी पुण्यातील संस्थेची संकल्पना लोकप्रिय

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस या संस्थेने, पालकांच्या सबलीकरणासाठी छोट्या छोट्या ऑडिओ संदेशांची मालिका तयार केली आहे.

काेराेनामुळे लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली अाणि दैनंदिन अनेक गाेष्टींवर बंधने लागू झाली. शाळा, काॅलेज सुरु हाेण्यात अडचणी निर्माण हाेत असतानाच मुलांना अक्षर अाेळख करणाऱ्या अंगणवाड्या बंद असल्याने चिमुरडया विद्यार्थ्यांचे शिक्षणाचा प्रश्न एेरणीवर अाला अाहे. अंगणवाडी सुरु झाल्यास कोरोना विषाणूचा त्रास लहान मुलांना, कोणत्या प्रमाणात होईल याची चिंता ही सर्वत्र पसरलेली आहे. या सगळ्या कारणांमुळे प्रचंड भावनिक ताण-तणाव पालकांना जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी पुण्यातील सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस यासंस्थेने, पालकांच्या सबलीकरणासाठी छोट्या छोट्या ऑडिओ संदेशांची मालिका तयार केली आहे. या मालिकेतून मुलांसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी, सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्यासाठी, साध्या सोप्या युक्त्या पालकांना सुचवण्यात आल्या आहेत. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खेळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्याने ते देशातील विविध राज्यात उपयोगी ठरु लागले अाहे.

दुर्गम भागातील पालकांपर्यंत हा अाॅडिअाे मेसेज पाेहचवण्याकरता जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी, महिला सुपरवायझर आणि अंगणवाडी सेविकांकडून साखळी पद्धतीने पालकांशी संवाद साधला जातो. सजग संदेश अंगणवाडी सेविकेपर्यंत व्हॉट्स अॅप किंवा ब्ल्यूटूथद्वारे दर आठवड्यात एक याप्रमाणे एकात्मिक बालविकास सेवा प्रणालीद्वारे पोहोचवले जातात.

देशभरातील अंगणवाडीत उपक्रम राबवणार

सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस संस्थेचे संचालक चित्तरंजन काैल म्हणाले, काेविडचा काळ सुरु झाल्यानंतर ही महामारी दीर्घकाळ अापल्यासाेबत राहणार असल्याचे जाणवल्याने अंगणवाडीतील लहान मुलांवर याचा विपरित परिणाम पुढील वर्षभर हाेर्इल असे दिसून अाले. त्यामुळे लाॅकडाऊन दरम्यान अाॅडिअाे क्लिपची संकल्पना प्रत्यक्षात अाली. एकात्मिक बालविकास सेवा प्रणालीद्वारे देशभरातील १५ लाख अंगणवाडी हा उपक्रम राबवण्याचा मानस अाहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser