आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाग्रस्तांसाठी वरदान:पुण्यात कोरोनाग्रस्तांसाठी ऑक्सिजन संवर्धक यंत्राचे संशोधन यशस्वी, अत्यवस्थ रुग्णाल कृत्रिमरीत्या देतात ऑक्सिजन

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गाचा श्वसनाशी थेट संबंध आहे. अनेकदा गंभीर अवस्थेतील, अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देण्याची आवश्यकता निर्माण होते. त्यामुळे रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग तसेच ऑपरेशन थिएटर्समध्ये ऑक्सिजन संवर्धन युुनिटची गरज असते. अशा परिस्थितीत, पुणेस्थित राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या संशोधकांनी ‘संवर्धित ऑक्सिजन यंत्रां’चे संशोधन यशस्वी केले आहे. एनसीएलच्या अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. उल्हास खरुल यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे संशोधन केले आहे. डॉ. खरुल म्हणाले, ‘सध्या जगभरात आणि देशभरात कोरोनामुळे संकट निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते आहे. तसेच गंभीर व अत्यवस्थ रुग्णांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात ऑक्सिजन संयंत्र निर्मितीचे आव्हान आम्ही स्वीकारले. अल्पावधीत आम्ही दहा युनिट्सची निर्मिती केली आहे. हे संयंत्र हवेतील ऑक्सिजन एकत्र करते, संवर्धित करते. बंगळुरू येथील टेक्निकल इन्स्पेक्शन असोसिएशनने हे संयंत्र प्रमाणित केले आहे. त्यानंतर उत्पादनाचा परवाना जेनेरिच मेंबरेन्स या स्टार्टअप कंपनीला देण्यात आला आहे. रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पहिल्या ५० संयंत्रांचा यशस्वी वापर सुरू झाला आहे. तसेच नायडू संसर्गजन्य रुग्णालयात श्वसनाचा सौम्य त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी केला जात आहे.

रुग्णांसाठी वरदान

  •  रोगाच्या सुरुवातीच्या काळातच पूरक स्वरूपात ऑक्सिजन मिळाला, तर वेगाने सुधारणा त्यामुळे व्हेंटिलेटर रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत
  •  व्हेंटिलेटरनंतर या युनिटचा वापर केल्यास ऑक्सिजन सिलिंडरची मागणीही कमी, दुर्गम खेड्यापाड्यात सहज वापरता येण्याजोगे
  • ज्या अन्य रुग्णांच्या उपचारादरम्यान साधारण २५ ते ३५ टक्के ऑक्सिजनची गरज भासते, त्यांना उपयुक्त (वेळेआधी जन्मलेली बाळे, सर्पदंश रुग्ण, दमा, फुप्फुसविकाराचे रुग्ण

असे आहे संयंत्र

  • पोकळ पॉलिमर मेबरेन (तंतुपटल) वर आधारित रचना
  •  हवेतूनही ऑक्सिजन मिळवते
  • ३० ते ४० टक्के ऑक्सिजनवृद्धी मिळते
  •  पॉलिमरमधील पटलभिंती (कार्टरिज) मार्फत हवेचे चलनवलन होते
  •  अन्य घटकांपासून ऑक्सिजन वेगळा केला जातो
बातम्या आणखी आहेत...