आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवारांना आलेल्या धमकीनंतर बाळासाहेब थोरातांनी राज्य सरकारवर टीका केली, यावर बोलताना वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकरांना गेल्या दोन वर्षांमध्ये धमक्या आल्या होत्या. मग मागील 2 वर्षांत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता का, असा सवाल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की , काही वर्षांत राजकीन नेत्यांना डरपोक धमक्या येत आहेत. शरद पवार, मिलिंद नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमक्या आल्या आहेत. व्हॉटअॅपला धमक्या येतात, यांना पोलिस शोधून काढतात, काँग्रेस नेत्यांनी जाहीर सभेत मोदींना संपवून टाकू अशी धमकी देतात, पण ज्या लोकांचे आयुष्य देशातील जनतेसाठी गेले ते अश्या धमक्यांना घाबरणार आहेत का? असे म्हणत मुनगंटीवार यांनी पोलिस बरोबर बंदोबस्त करतील असे म्हटले आहे.
सर्वांनी जनतेसाठी एकत्र यावे?
अधिवेशनाअगोदर टीका करणे म्हणजे विरोधी पक्ष नव्हे तर जनतेसाठी काम करणे गरजेचे असते, असे सांगताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे. सत्तेत असताना विरोधकांनी काय केले हे जर आम्हाला सांगितले तर विरोधक आणि सत्ताधारी सोबत येत सबका साथ सबका विकास हे धोरण राभवायचे आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले मुनगंटीवार?
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की , अधिवेशनाच्या अगोदर चहापानीचा मुद्दा का आलाय? तर यासाठीच की जनतेच्या प्रश्नावर काम करता यावे, विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे काही वैरी आहोत ही भूमिका नाही. तर सबका साथ आणि सबका विकास ही भूमिका आमची आहे. संवादातून जनतेचे प्रश्न सुटावे ही भूमिका आपली असली पाहिजे असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 2 वर्षे मी म्हणत होतो की, दानाचा बोनस द्यावा, यावेळी अजित पवार म्हणायचे की देणार नाही, आम्ही घेणार असेच म्हणत होतो.
अधिवेशनावरही भूमिका मांडली
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अधिवेशन गुडाळण्याचा प्रश्नच येत नाही, गेली 2 वर्षे तर अधिवेशन झालेच नाही. त्या अगोदर जे अधिवेशन झाले ते 1 आठवडा झाले होते. आजच अधिवेशना संदर्भात चर्चा झाली, की भविष्यात एक अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्यात यावे. यामुळे विदर्भाच्या, मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ते शब्दांनी नाही तर क़ृतीने असेही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.तलावाचा विषय असो की, माजी मालगुजारी की दानाचा बोनस या सर्व विषय असेल, उद्योग सर्व राज्यात पसरायला हवे यासाठी सुपरफास्ट सरकार कटिबद्ध आहे, असा आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.