आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या देश करत असलेली इंधनाची आयात कमी करण्यासाठी येणाऱ्या काळात पर्यायी इंधनाचा वापर करणे फायदेशीर ठरेल. यावर इथेनॉल हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आता ऊसाचा रस, शुगरकेन सिरपपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली आहे. शेतकरी व साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. इथेनॉलप्रमाणेच ग्रीन हायड्रोजन हेदेखील आपले भविष्य ठरू शकते. कारखान्यांना ग्रीन हायड्रोजन निर्मितीतूनही उत्पन्न मिळू शकते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने या सर्व पर्यायांचा विचार करून ते लोकांसमोर आणावेत असे मत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.
साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, पुणे व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषदेचे कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार , राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( ऑनलाईन), उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्याचे इतर मंत्री व सहकार क्षेत्रात कार्यरत नेते उपस्थित होते.
गडकरी म्हणाले,देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ग्लोबल इकोनॉमी समजणे आवश्यक आहे. आज जगात तीन गोष्टींची चर्चा आहे, फूड, फ्युएल आणि फर्टिलाईझर. यापैकी फ्युएल आणि फर्टिलाईझर यांचे उत्तर फुडमध्ये म्हणजेच शुगर इंडस्ट्रीत आहे. त्यामुळे या क्षेत्रात योग्य दृष्टीकोन ठेवून काम झाले, तर आपला कृषी विकास दर वाढेल, नवीन रोजगार निर्माण होतील व शेतकरी समृद्ध व संपन्न होईल. पुण्यातील सर्व वाहने बायो इथेनॉल वर चलविण्याकरिता तीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आले पाहिजे आणि आगामी काळात इथेनॉल पंप संख्या वाढवत नेली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.