आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Sugarcane Issue Maharashtra Sharad Pawar Pune | This Year's Cane Harvesting Would Have To Be Planned Before The Start Of The Factory

साखर परिषदेत शरद पवारांचे वक्तव्य:म्हणाले, यंदाच्या हंगामात ऊस ताेडणीचे नियाेजन कारखाने सुरू हाेण्यापूर्वी करा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दाेन वर्ष पाऊस चांगल्याप्रकारे झालेला आहे त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. ऊस कारखान्यांवर अतिरिक्त ऊस उत्पादनाचा भार पडलेला आहे. पावसाची अनुकुलता पाहता उसाचे क्षेत्र आगामी काळात आणखी वाढणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ऊस ताेडणीचे नियाेजन कारखाने सुरू हाेण्यापूर्वी करावे लागणार आहे. जालना, बीड, लातूर, परभणी आदी जिल्हयात उसाचे क्षेत्र यंदा अधिक हाेते. उसाचे वाहतूकीचा प्रश्न गंभीर हाेईल. कारखान्यांनी वाहतूकीचा खर्च वाढवून दिला परंतु तरी शेतकऱ्यांना ही पैसे द्यावे लागले आहे. त्यामुळे साखर कारखानदार व आयुक्त यांनी याबाबत सुनियाेजन करुन लक्ष्य द्यावे असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्सिटटयूट येथे आयाेजित राज्यस्तरीय साखर परिषदेच्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री बाळासाहेब थाेरात, मंत्री राजेश टाेपे, खासदार श्रीनिवास पाटील,साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित हाेते.

पवार म्हणाले, साखर कारखानदारीत महाराष्ट्राने देशात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या वर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून जगात ब्राझीलला मागे टाकत साखर उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. साखरेचे उत्पादनात देशात प्रथम क्रमांकावर उत्तरप्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राने मिळवलेला आहे. काळानुरुप सर्वव्यापी साखर उद्याेगाचे सूक्ष्म धाेरण ठरवून पुढील वाटचाल करावी लागेल.

केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी प्राेत्साहन दिले. त्यामुळे साखर उत्पादनास चालना मिळाली. यंदाच्या हंगामात साखर उत्पादान इतिहासात साखर उत्पादन विक्रमी हाेणार आहे. साखरेची निर्यात पाहता यंदा भारतातून ९० लाख टन पेक्षा अधिक साखर निर्यात हाेऊ शकते. साखर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ५० टक्क्यापेक्षा अधिक आहे ही आनंदाची बाब आहे. गेल्या तीन हंगामापासून साखर कारखान्यांनी साखर निर्यातीस प्राधान्य दिले आहे.महाराष्ट्रात यंदा १३२२ लाख टन उसाचे गाळप असून १३८ लाख टन साखर निर्मिती हाेईल असा अंदाज आहे. इथेनाॅल निर्मितीसाठी १५ लाख टन उसाचा वापर आतापर्यंत झाला आहे. मराठवाडा, अहमदनगर,, साेलापूर याठिकाणी उसाचे क्षेत्र वाढल्याने उसताेडणी कामगार वेळेत न मिळाल्याने साखर गाळप हगाम लांबला आहे. ६४ लाख टन साखर निर्यातीचे यंदा महाराष्ट्राचे लक्ष्य असून ४० लाख टन साखर निर्यात झाली आहे.

भारतात साखर निर्यातीस चालना मिळाली असून ९२ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले असून ८२ लाख टन साखर निर्यात झाली आहे. भारताने १२१ देशात साखर यंदा निर्यात केलेली आहे, यापूर्वी प्रथमच इतक्या माेठया प्रमाणात अनेक देशात साखर निर्यात झालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...